हुक्केरी तालुक्यातील नागरमुन्नोळी येथील सरकारी हायस्कूलचा दर्जा वाढवून आता तिथे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.


आमदार प्रकाश हुक्केरी यांनी या संदर्भातील अधिकृत आदेशाचे पत्र ग्रामस्थांना सुपूर्द केले. नागरमुन्नोळी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या शिक्षणासाठी चिक्कोडी किंवा मजलट्टी येथे जावे लागत होते. अनेक गरीब विद्यार्थी प्रवासाच्या त्रासामुळे शिक्षण सोडून देत होते. ही अडचण लक्षात घेऊन प्रकाश हुक्केरी यांनी शिक्षण मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून हे कॉलेज कार्यान्वित होणार असून यामुळे ग्रामीण भागातील मुलांची मोठी सोय झाली आहे.


Recent Comments