खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात डॉ. अंजली निंबाळकर यांनी गोवा राज्याच्या प्रभारी आणि एआयसीसी सचिव म्हणून विविध विषयांवर के. सी. वेणुगोपाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करून गोव्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे डॉ. अंजली निंबाळकर यांनी बैठकीत सांगितले. याप्रसंगी के. सी. वेणुगोपाल यांच्यासह खासदार सेंथिल, वंशचंद्र रेड्डी आणि ठाकरे उपस्थित होते.


Recent Comments