Bagalkot

बागलकोटमधील फर्निचर दुकानाला भीषण आग

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे शॉर्ट सर्किटमुळे एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जमखंडीमधील कट्टे कलेजवळ असलेल्या या दुकानाने बघता बघता रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले.

जमखंडी शहरातील कट्टे कलेजवळ असलेल्या ‘आलगूर एंटरप्रायझेस’ या फर्निचर दुकानाला आज पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सादिक आलगूर यांच्या मालकीच्या या दुकानातील सोफा सेट, महागडे फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की, शेजारीच असलेल्या मेट्रो फर्निचर दुकानापर्यंत तिची झळ पोहोचली होती.

स्थानिकांनी तातडीने धाव घेत आगीच्या विळख्यातून काही वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या समयसूचकतेमुळे शेजारच्या इतर दुकानांना आग लागण्यापासून वाचवण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे. सध्या आग विझवण्यात आली असून, या दुर्घटनेत दुकान मालकाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

Tags: