Bagalkot

बागलकोटमध्ये बीटीडीए कार्यालयावर लोकयुक्तांचा छापा

Share

बागलकोट शहर विकास प्राधिकरण कार्यालयावर आज लोकयुक्त पोलिसांनी अचानक छापा टाकला. भूखंड वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून अधिकारी सध्या कागदपत्रांच्या तपासणीत व्यस्त आहेत.

बागलकोटमधील विद्यागिरी भागात असलेल्या बीटीडीए कार्यालयावर लोकयुक्त अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. भाडेकरूंना भूखंड वाटप करताना नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. लोकयुक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सुरेश रेड्डी आणि त्यांच्या पथकाने कार्यालयात प्रवेश करून तपासणी सुरू केली आहे.

गेल्या काही तासांपासून लोकयुक्त अधिकारी बीटीडीए कार्यालयात तळ ठोकून असून भूखंड वाटपाशी संबंधित फाईल्सची सखोल चौकशी करत आहेत. या कारवाई दरम्यान गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते. लोकयुक्तांच्या या आकस्मिक छाप्यामुळे प्राधिकरणामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tags: