Khanapur

दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन

Share

नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे आयोजित काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला मेळाव्याचे उद्घाटन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सहभाग नोंदवत महिला सक्षमीकरणावर भर दिला.

नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे ओबीसी काँग्रेस महिला राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करून महिला सक्षमीकरण आणि ओबीसी समुदायाच्या हक्कांवर मार्गदर्शन केले. यावेळी एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी उपस्थित राहून राष्ट्रीय नेत्यांसोबत व्यासपीठ सामायिक केले. देशभरातून आलेल्या हजारो महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Tags: