Khanapur

डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडून पुद्दुचेरीमध्ये पक्ष संघटनेला बळ

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी पुद्दुचेरी येथील काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन पक्ष संघटनेबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी पुद्दुचेरीमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणूक प्रक्रियेतील बारकावे आणि प्रचाराची दिशा यासंदर्भात डॉ. निंबाळकर यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे पुद्दुचेरीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

या भेटीदरम्यान पुद्दुचेरी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. अंजली निंबाळकर यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. पक्ष संघटनेसाठी त्या घेत असलेल्या परिश्रमांचे यावेळी उपस्थित नेत्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: