खानापूर तालुक्यातील तोलगी येथील ग्रामदेवतेचा यात्रोत्सव येत्या २० एप्रिल रोजी उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गावात पूर्वतयारी बैठक घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.


या यात्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी येणार असून त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, अखंड वीजपुरवठा आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश आमदार विठ्ठल हलगेकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यात्रेपूर्वी गावातील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था आणि मंदिर परिसरातील प्रलंबित बांधकामे प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच भाविकांच्या प्रवासासाठी जादा बसची सोय करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या.

धार्मिक उत्सव हे सामाजिक एकतेचे प्रतीक असून यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उत्तम सुविधा मिळणे आणि गावाचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे. गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे विठ्ठल हलगेकर यांनी म्हटले.
या बैठकीला गाव पंच कमिटीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पीडीओ, स्थानिक युवक मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments