बागलकोट जिल्ह्यात ऐतिहासिक होळीच्या उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. बनहट्टी येथील एस.आर.ए. कॉलेज मैदानावर आयोजित भव्य ‘रेन डान्स’मध्ये हजारो तरुण-तरुणींनी सहभाग घेत संगीताच्या तालावर ठेका धरला.


सिद्धू कोन्नूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या रंगोत्सवाचे नेटके नियोजन केले होते. विशेष म्हणजे, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम साधत हा सण साजरा करण्यात आला.
बागलकोट शहरातही होळीचा रंग चढला असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत असून संपूर्ण शहर विविध रंगांत न्हाऊन निघाले आहे. पुढील तीन दिवस चालणाऱ्या या ऐतिहासिक रंगोत्सवात जिल्हावासीय शांततेत आणि सलोख्याने सहभागी होत आहेत.


Recent Comments