बागलकोट जिल्ह्यात रंगांच्या सणाला उत्स्फूर्त सुरुवात झाली असून बीळगी शहरात ‘रेन डान्स’च्या माध्यमातून तरुणाईने मोठा उत्साह साजरा केला आहे. जिल्ह्यात आजपासूनच होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळत असून ठिकठिकाणी रंगांची उधळण होत आहे.

बागलकोट जिल्ह्यात पहिल्याच दिवशी होळीचा रंग चांगलाच चढलेला दिसत आहे. जिल्ह्यातील बीळगी शहरात बसस्थानकासमोर विशेष रेन टेंट उभारण्यात आला असून डीजेच्या तालावर तरुण-तरुणींनी गाण्यांवर ठेका धरला. मंचावर तरुणींनी नृत्य सादर करून सर्वांचे मनोरंजन केले, तर बीळगीतील तरुणांनी रंगात न्हाऊन निघत जल्लोषात सहभाग नोंदवला.
बागलकोट शहरात उद्यापासून अधिकृतपणे होळी उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. जुने शहर, विद्यागिरी आणि नवनगर भागात सलग तीन दिवस रेन डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच बागलकोटची ऐतिहासिक मिरवणूक आणि चित्रविचित्र सोंगांच्या गाड्यांचे प्रदर्शन हे जिल्ह्याचे मुख्य आकर्षण ठरेल. या सोहळ्यासाठी हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक सज्ज झाले असून संपूर्ण शहर रंगमय होणार आहे.


Recent Comments