Bagalkot

बागलकोटमध्ये रंगोत्सवाचा जल्लोष; ऐतिहासिक होळी सणाला उत्साहात सुरुवात

Share

ऐतिहासिक वारसा असलेल्या बागलकोटच्या होळी सणाला आज पहाटेपासून अधिकृत सुरुवात झाली. शहराच्या किल्ला गल्लीत बसवप्रभू सरनाडगौडा यांनी हलगि वादन करून होलिका दहन प्रक्रियेला प्रारंभ केला.

पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात हलगिच्या तालावर अबालवृद्धांनी ठेका धरला. होलिका दहन केल्यानंतर नागरिकांनी एकमेकांवर रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला. बागलकोटमधील सामाजिक सलोख्याचे दर्शन या रंगोत्सवातून घडले.

आज दिवसभर शहरात विविध ठिकाणी होलिका दहन करण्यात येणार असून, उद्यापासून खऱ्या अर्थाने रंगांचा उत्सव सुरू होईल. यानिमित्ताने बागलकोटचे जुने शहर, विद्यागिरी आणि नवनगर भागात सलग तीन दिवस भव्य ‘रेन डान्स’चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता असून, संपूर्ण बागलकोट शहर रंगांच्या वर्षावात न्हाऊन निघणार आहे.

Tags: