बागलकोटमध्ये आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या दौऱ्यादरम्यान मोठा राजकीय हायड्रामा पाहायला मिळाला. शहरात जमावबंदी लागू असतानाही यत्नाळ यांनी समर्थकांसह प्रवेश केल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.

आमदार यत्नाळ यांचे स्वागत करण्यासाठी बसवेश्वर चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र, जमावबंदी लागू असल्याने पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी यत्नाळ यांना खासगी रुग्णालयाजवळच अडवले. यावेळी यत्नाळ यांनी बसवेश्वर चौकात जाण्याचा आग्रह धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलीस अधीक्षकांच्या यशस्वी शिष्टाईनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला.
पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन यत्नाळ यांनी ठरवून दिलेल्या मार्गाने थेट रुग्णालयाकडे प्रस्थान केले. असे असले तरी, यत्नाळ यांच्या वाहनासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून मिरवणूक काढत जोरदार घोषणाबाजी केली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर यत्नाळ यांनी जखमी अशोक बारकेर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना वैयक्तिक स्तरावर आर्थिक मदत देऊन दिलासा दिला.


Recent Comments