Dharwad

धारवाडमध्ये कुशन शॉपला भीषण आग

Share

धारवाडमधील हलियाळ नाका परिसरात असलेल्या एका कुशन शॉपला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

धारवाडमधील हलियाळ नाका टीव्ही टॉवरनजीक असलेल्या कर्नाटक कुशन वर्कशॉपमध्ये ही घटना घडली. मुज्जामिल यांच्या मालकीचे हे दुकान रात्री बंद असताना अचानक धूर निघू लागला. आगीने रौद्र रूप धारण करताच स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर केले. या दुकानाच्या शेजारी हॉटेल आणि इतर व्यावसायिक गाळे होते, मात्र आग पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामुळे मोठी हानी टळली असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पोलीस तपासानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल. उपनगर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: