हुक्केरी शहरातील वीज सहकारी संस्थेच्या वर्कशॉपमध्ये अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.


आज दुपारी दोनच्या सुमारास वीज सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यालयातील विद्युत उपकरणे दुरुस्ती विभागात अचानक ही आग लागली. आगीचा भडका उडताच तेथील कामगारांनी आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर यशस्वी नियंत्रण मिळवले.

या घटनेची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष महावीर निलजगी आणि व्यवस्थापकीय संचालक पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आगीमध्ये ट्रान्सफॉर्मर आणि इतर दुरुस्तीसाठी आलेले लाखो रुपयांचे महत्त्वाचे विद्युत साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, यामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.



Recent Comments