बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि साई स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूरच्या मराठा मंडळात जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.

स्पर्धेचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण साई स्पोर्ट्स अकादमीचे प्रसाद जाधव व राजलक्ष्मी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रप्रसंगी सूर्यकांत हिंदलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालकांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशिष अंगडीकर, आरोही काटगाळकर, साई आनंदाचे, नक्ष हिरेमठ यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश कुलकर्णी आणि ऋषिकेश पसारे यांच्या टीमने परिश्रम घेतले.
आशिष अंगडीकर, आरोही काटगाळकर, साई आनंदाचे, नक्ष हिरेमठ, कार्तिक चौधरी, विक्रांत चौधरी, सुजित साळोखे, शिवांगी मोदगेकर, श्रेयस भजंत्री, आदिया सय्यद, अभिना तहसीलदार, अल्मास तहसीलदार आणि अक्किरामक्ष यांनी सुवर्णपदक मिळवले. तसेच सोहम वाघमारे, मायशा जैन, स्वराज पाटील यांनी रौप्य, तर सार्थक मारदोळकर याने कांस्यपदक पटकावले.


Recent Comments