बेळगाव-खानापूर मुख्य रस्त्यावरील हलकर्णी परिसरात वाहनधारकांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रस्त्याकडेला असलेली माडाची झाडे वाळवी लागल्याने पडण्याच्या स्थितीत असून, वन विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
बेळगाव आणि खानापूर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर रोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, हलकर्णी गावाच्या हद्दीतील ही अजस्त्र माडाची झाडे आता धोकादायक बनली आहेत. झाडांना पूर्णपणे वाळवी लागल्याने ती आतून पोकळ झाली असून, ही झाडे कधीही रस्त्यावर कोसळण्याची भीती आहे. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत सीमावर्ती हितरक्षण वेदिकेचे खानापूर तालुका अध्यक्ष आणि समाजसेवक राजू खातेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने, विशेषतः एसीएफ सुनीता निंबरगी यांनी तातडीने या भागाची पाहणी करून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच ही धोकादायक झाडे हटवावीत, अशी आग्रही मागणी राजू खातेदार यांनी केली आहे.


Recent Comments