बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावातील एका आरसी प्लांटमध्ये किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
झुंजरवाड येथील आरसी प्लांटमध्ये कामावर असताना शेखर मादर आणि विश्वनाथ उप्पासे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पाहता पाहता हा वाद वाढला आणि दोन्ही तरुणांनी एकमेकांवर दगड तसेच लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात शेखर मादर याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनेनंतर जखमी शेखरला तातडीने अथणी येथील सामुदायिक रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ऐगळी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


Recent Comments