खानापूर तालुका पंचायत सभा गृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा न लावल्याबाबत ‘इन न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली आहे. या बातमीच्या परिणामामुळे आता सभा गृहात महापुरुषांच्या प्रतिमा सन्मानाने लावण्यात आल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या नूतन सभा गृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या नव्हत्या. यावरून समाजसेवक जोतिबा बेंडिगेरी यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला होता. ‘इन न्यूज’ वाहिनीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बातमी प्रसारित केली आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जनतेसमोर आणला.
वाहिनीवर बातमी प्रसिद्ध होताच तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यांनी तत्काळ सभा गृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्याचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी केली. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘इन न्यूज’च्या बातमीला यश मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.


Recent Comments