Hukkeri

हुक्केरी : मदिहळ्ळी पीकेपीएस अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बागी परिवाराची बिनविरोध निवड

Share

हुक्केरी तालुक्यातील मदिहळ्ळी येथील प्राथमिक कृषी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गुरुसिद्ध मायप्पा बागी आणि उपाध्यक्षपदी वंदना सिद्धप्पा बागी यांची बिनविरोध निवड झाली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत बागी समर्थकांनी वर्चस्व सिद्ध केले.

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क कोणाला मिळणार, यावरून मदिहळ्ळी पीकेपीएस संस्था संपूर्ण राज्यात चर्चेत आली होती. माजी खासदार रमेश कत्ती आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईमुळे या संस्थेच्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत गुरुसिद्ध बागी आणि वंदना बागी यांची बिनविरोध निवड होणे ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विठ्ठल वाळकी, काडप्पा कुरबेट, गोपाळ बागी, तानाजी होसुरी, रामचंद्र बन्ननवर, फातिमा बळीगार, सिद्रामेश्वर जिरली आणि नामदेव पांढरे हे बहुमताने निवडून आले होते. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी एन. एल. हुलकुंद, वकील बी. बी. बागी, अंबरीश बन्नकगोळ, विजय मडीवाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: