सुरक्षा रक्षकाचे काम करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा निर्जन स्थळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. धारवाड जिल्ह्यातील नवनगरच्या बाह्य भागात आज ही धक्कादायक घटना घडली आहे.
कळस गावातील रहिवासी असलेल्या रमेश (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश हा नवनगर परिसरात वॉचमनच्या कामासाठी आला होता. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतरच त्याच्या आत्महत्येमागचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments