Khanapur

खानापूरच्या सर्वोदय विद्यालयात युकेजीच्या चिमुकल्यांचा निरोप समारंभ

Share

खानापूर येथील प्रतिष्ठित सर्वोदय विद्यालयात युकेजीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आणि इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. प्राथमिक शिक्षणाच्या दिशेने पाऊल ठेवणाऱ्या या चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वोदय विद्यालयात आयोजित या सोहळ्यात नर्सरी, एलकेजी आणि युकेजी विभागातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्ये आणि कलाप्रकार सादर करून पालकांची मने जिंकली. मुलांच्या अंगभूत प्रतिभेला वाव मिळावा आणि त्यांच्या पुढील शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने शालेय व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य फादर नेल्सन पिंटो यांनी भूषवले. यावेळी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपले भविष्य उज्ज्वल घडवावे, असे आवाहन नेल्सन पिंटो यांनी केले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Tags: