Khanapur

गंदीगवाड ग्रा.पं. कार्यालयाचे थाटात उद्घाटन आणि पी़डीओ नदाफ यांचा गौरव

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गंदीगवाड ग्रामपंचायतीमध्ये आज नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आणि सदस्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

खानापूर तालुक्यातील गंदीगवाड ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन सरपंच देसाई गाळी यांनी वास्तुपूजनाने केले. पाच वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सदस्यांना यावेळी सन्मानाने निरोप देण्यात आला. गावच्या प्रगतीसाठी झटणारे समाजसेवक, अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देसाई गाळी यांनी दिल्या आहेत.

गावच्या विकासकामांना गती देणारे पी़डीओ उस्मान नदाफ यांना ‘कर्नाटक राज्य गडिनाडू हितरक्षणा वेदिके’च्या वतीने ‘गडिनाडू सिरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गावच्या प्रगतीसाठी जनतेचे सहकार्य हीच खरी शक्ती असल्याची भावना उस्मान नदाफ यांनी व्यक्त केली.

रेंगाळलेली कामे मार्गी लावणाऱ्या उस्मान नदाफ यांच्या कार्यक्षमतेचे समाजसेवक एम. एम. राजीबाई यांनी विशेष कौतुक केले. या सोहळ्याला उपसरपंच लक्ष्मी कमतगी, बसवराज बंगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: