Dharwad

धारवाडच्या डिमान्स हॉस्पिटलमध्ये पीजी विद्यार्थिनीची आत्महत्या

Share

धारवाड येथील प्रसिद्ध डिमान्स संस्थेच्या वसतिगृहात एका पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, डॉ. प्रज्ञा पालेगर (२४) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

धारवाड येथील डिमान्स संस्थेमध्ये मानसोपचार विभागाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रज्ञा पालेगर हिने वसतिगृहात गळफास लावून आपले जीवन संपवले. मूळची शिवमोग्गा येथील असलेली प्रज्ञा अवघ्या आठवड्यापूर्वीच गावाहून परतली होती. ती डॉ. प्रिया पाटील नावाच्या मैत्रिणीसोबत रूम शेअर करत होती. विशेष म्हणजे, कालच प्रज्ञाचे आई-वडील तिला भेटण्यासाठी धारवाडला आले होते. पालकांच्या भेटीमुळे तिची रूममेट प्रिया काल एका दिवसासाठी दुसऱ्या खोलीत राहण्यास गेली होती.

काल रात्री प्रज्ञा खोलीत एकटीच होती. आज सकाळी जेव्हा तिची मैत्रिणी खोलीवर परतली, तेव्हा प्रज्ञाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच धारवाड उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags: