Khanapur

प्रजासत्ताक दिनी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले रक्तदान

Share

बेंगळुरू येथील हेब्बाळमधील एम्बसी लेक टेरेसेस येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संकल्प इंडिया फाऊंडेशनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी रक्तदान करून राष्ट्रीय उत्सवाला एक नवी मानवतावादी दिशा दिली.

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरात डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या मैत्रिणी डॉ. गौरी आणि स्वाती यांनाही या सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित केले. अंजली निंबाळकर यांच्या शब्दांनी प्रेरणा घेऊन या दोघींनीही आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले. या शिबिरात संकलित झालेले रक्त थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.

वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी केवळ एक नेत्या म्हणूनच नव्हे, तर एक डॉक्टर म्हणूनही समाजाला रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या आपल्या मैत्रिणींमधील भीती दूर करून त्यांना प्रोत्साहित करत त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. राजकारणासोबतच निरंतर समाजसेवेमध्ये सक्रिय असलेल्या अंजली निंबाळकर यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Tags: