Bagalkot

बागलकोटमध्ये भगिनी समाजाकडून राष्ट्रध्वजाचा अवमान

Share

बागलकोटमधील नवनगर भागात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त फडकवण्यात आलेला ध्वज नियमानुसार सूर्यास्तापूर्वी उतरवणे आवश्यक असताना, त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

बागलकोट शहरातील नवनगर येथील भगिनी समाज संस्थेच्या इमारतीसमोर फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज रात्री उशिरापर्यंत न उतरवल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ध्वजारोहण करण्यात आले होते. मात्र, नियमानुसार संध्याकाळी ध्वज उतरवणे अपेक्षित असताना भगिनी समाजाचे कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांनी रात्री ७:३० वाजेपर्यंत ध्वज तसाच ठेवून बेजबाबदारपणा दाखवला.

रात्रीच्या वेळीही राष्ट्रध्वज फडकताना पाहून जिल्हा भीम आर्मी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला. भीम आर्मीचे बसवराज नीलनायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नियमानुसार राष्ट्रध्वज सन्मानाने खाली उतरवला. राष्ट्राची अस्मिता असलेल्या ध्वजाबाबत अशा प्रकारची गंभीर चूक करणाऱ्या संस्थेवर नागरिक आता कडक भाषेत टीका करत आहेत.

Tags: