Hukkeri

एकसंबा येथे १७ जानेवारीला भव्य रक्तदान शिबिर

Share

एकसंबा येथील स्वामी विवेकानंद युवा विकास आर्थिक संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आणि नूतन अध्यक्ष महेश बाकळे यांच्या ५० व्या रक्तादानाचे औचित्य साधून १७ जानेवारीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने १६ लाख रुपये खर्चून स्वामी विवेकानंदांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १७ जानेवारीला सकाळी ९:३० वाजता चिंचणी सिध्दसंस्थान मठाचे उत्तराधिकारी शिवप्रसाद देव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी संस्थेच्या नूतन वेबसाईटचे अनावरण आणि ‘विवेक सेवा सन्मान’ सोहळाही पार पडणार आहे.

या शिबिरात १५० हून अधिक युवक रक्तदान करणार असून आदर्श ब्लड बँक चिक्कोडी यांचे सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाला राघवेंद्रजी कागवाड, संजय अडके आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुनील पांगम आणि गुरुदत्त कामत यांनी दिली.

Tags: