धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ तालुक्यात आज सरकारी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. बसने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

कुंदगोळ तालुक्यातील कमडोळ्ळी आणि चिक्क हरकुणी गावांच्या दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. बसच्या धडकेमुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बसमधील काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर असून पोलीस तपासात जखमींची अधिकृत नावे आणि प्रवाशांच्या दुखापतींचा सविस्तर तपशील स्पष्ट होईल.


Recent Comments