Khanapur

रायण्णा वीर ज्योती यात्रेकडे तालुका अधिकाऱ्यांची पाठ

Share

नंदगड येथील पुण्यभूमीतून संगोळी उत्सवानिमित्त ‘क्रांतीवीर संगोळी रायण्णा वीर ज्योती’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या यात्रेच्या स्वागत सोहळ्याला अनेक तालुकास्तरीय अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रायण्णांच्या समाधी स्थळावर पूजन करून या यात्रेला प्रारंभ केला. ही ज्योत खानापूरमार्गे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून फिरून पुढे संगोळीला पोहोचणार आहे.

या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मोजके अधिकारी वगळता इतर विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली. अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे क्रांतीवीराचा अवमान झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नियोजनाच्या अभावामुळे अनेक ग्रामस्थांना या कार्यक्रमाची माहिती मिळाली नव्हती. क्रांतीवीराचा अवमान करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: