Khanapur

अंजली निंबाळकर यांनी घेतले दलाई लामा यांचे आशीर्वाद

Share

उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुंडगोड येथील तिबेटी वसाहतीला एआयसीसी सचिव आणि माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बौद्ध धर्मगुरू १४ वे दलाई लामा यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

शांती आणि अहिंसेचे दूत असलेल्या दलाई लामा यांची भेट घेऊन आपण मतदारसंघातील जनतेच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी विशेष प्रार्थना केली, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत कन्या लखम निंबाळकर आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags: