Dharwad

धारवाडमध्ये स्कुटीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

Share

नवीन वर्षाच्या निमित्त कलबेरी व्ह्यू पॉईंटला गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

धारवाडमधील जन्नत नगरचा रहिवासी मनीष गुडसलमनी (१६) हा गुरुवारी आपल्या मित्रांसह कलबेरी डोंगरावरील व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी गेला होता. डोंगरावरून परतत असताना त्याच्या स्कुटीचे नियंत्रण सुटले आणि तो खाली कोसळला. या अपघातात मनीषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Tags: