धारवाडमधील जन्नत नगर येथे गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जण भाजून जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इस्माईल होरकेरी यांच्या घरात आज सकाळी ही दुर्घटना घडली. सकाळी गॅस सुरू करताना गळतीमुळे अचानक आग भडकली आणि घरात पसरली. यामध्ये इनाया (३), कैफ (७), अमिना (२६), इस्माईल (३५), जरीना (६५) आणि महिरान (१३) हे जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना वाचवले आणि जिल्हा रुग्णालयात हलवले.
सध्या सहा पैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


Recent Comments