Dharwad

धारवाडच्या विद्यागिरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Share

धारवाडच्या सत्तूर-उदयगिरी येथील डबल रोडजवळ प्रतिबंधित गांजा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात धारवाडच्या विद्यागिरी पोलीस ठाण्याला यश आले आहे.

या प्रकरणी, धारवाड येथील २३ वर्षीय जिशान टिनवाळे, रायपूर येथील १८ वर्षीय मलिकरेहान पिरजादे, सत्तूर येथील २० वर्षीय मुबारक बागेवाडी आणि धारवाड सैदापूर येथील २० वर्षीय महम्मद अफजल बारूदवाळे यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी दुचाकीवरून तलवार व इतर शस्त्रे घेऊन धारवाड सत्तूरजवळील उदयगिरी डबल रोडवर गांजा विकण्याच्या तयारीत होते. या माहितीच्या आधारावर विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने कारवाई करत या चौघांना ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता, पोलिसांनी त्यांच्याकडून अंदाजे ६२ हजार रुपये किमतीचा १ किलो २२० ग्रॅम गांजा, ५०० रुपये रोख रक्कम, ३ मोबाईल आणि गांजा तस्करीसाठी वापरलेली एक दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी विद्यागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: