Bagalkot

“ईश्वरप्पा आणि यत्नाळ हे फक्त कॉमेडियन्स” – काशप्पणावर

Share

माजी मंत्री के.एस. ईश्वरप्पा आणि बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कण्हेरी स्वामी यांच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन दिल्याने राजकीय वादंग निर्माण झाला असून या दोघांविरुद्ध एच.वाय. काशप्पणावर यांनी इळकल शहरात तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

“हे लोक जीवनातील कॉमेडियन्स आहेत. हे सर्व ‘स्वयंघोषित नेते’ असून, यांना पाच पैशांचेही मत मिळत नाही. सिनेमात जसा कॉमेडियन असतो, तसेच हे राजकारणातील जोकर आहेत,” अशा शब्दांत काशप्पणावर यांनी झोडपले. काशप्पणावर यांनी यत्नाळ यांच्या वक्तव्यांची नक्कल ‘हिंदू… हिंदू… मीच वाघ… मीच वाघ…’ असे अभिनय करत केली. “हे स्वयंघोषित वाघ आहेत, यांना कोण घोषित करणार? ते स्वतःच घोषणा करतात,” असा उपहास त्यांनी केला. ईश्वरप्पा, यत्नाळ आणि कन्नेरी स्वामींसह हे ‘चार-पाच लोक’ राजकारणातील केवळ ‘जोकर’ असल्याचे काशप्पणावर यांनी सुनावले. “हे लोक केवळ तोंडाच्या समाधानासाठी, मनाच्या समाधानासाठी बोलून आपली खाज भागवून घेतात,” अशा शब्दांत त्यांनी समाजाला या नेत्यांच्या वक्तव्यांना महत्त्व देऊ नका, असे आवाहन केले.

Tags: