बागलकोट येथे जिल्हा पालकमंत्री आर.बी. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक विकास कार्यक्रम बैठक पार पडली.

बागलकोट नवनगर येथील जिल्हा प्रशासन भवनाच्या नवीन जिल्हा परिषद सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत २०२५-२६ या वर्षातील विविध विभागांच्या विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
मंत्री तिम्मापूर यांनी सर्व विभागांच्या विकास कार्याची आणि प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
बैठकीत आमदार जे.टी. पाटील, सिद्धू सवदी, तसेच विधान परिषद सदस्य पूजारा आणि हनुमंत निरानी हे लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा स्तरावरील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. .


Recent Comments