हैद्राबादमध्ये २३ कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या दाम्पत्याला धारवाड जिल्हा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे.

सतीश उप्पलपती आणि शिल्पा बांडे अशी अटक केलेल्या या दोन मुख्य आरोपींची नावे आहेत. धारवाड जिल्हा पोलिसांनी त्यांना हुबळी-धारवाड बायपासवर अटक करून, पुढील तपासणीसाठी हैद्राबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

फसवणूक प्रकरणाची पार्श्वभूमी अटक आरोपी सतीश उप्पलपती आणि शिल्पा बांडे यांच्यावर हैद्राबाद येथील सेंट्रल क्राईम स्टेशनमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होते. विविध प्रकरणांमधून या दाम्पत्याने सुमारे २३ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यांनंतर आरोपी पोलीस यंत्रणेच्या नजरेतून वाचण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये लपून बसले होते.
पोलिसांची संयुक्त कारवाई आरोपी हुबळी-धारवाड बायपासवरून प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती हैद्राबाद पोलिसांकडून धारवाड जिल्हा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तातडीने तयार करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ बायपासवर तपासणी नाके उभारले आणि महामार्ग गस्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपींना यशस्वीरित्या पकडले.
फसवणूक प्रकरणातील आरोपी सतीश उप्पलपती आणि शिल्पा बांडे यांना अटक केल्यानंतर, धारवाड पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपासासाठी त्यांना हैद्राबाद सेंट्रल क्राईम स्टेशन पोलिसांच्या सुपूर्द केले आहे.


Recent Comments