Bagalkot

सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक निबंध सादरीकरण’ पुरस्काराची शिवानी वाघेला मानकरी

Share

बेळगाव येथील रहिवासी आणि बागलकोट येथील पी.एम.एन.एम. दंत महाविद्यालय व रुग्णालयाची विद्यार्थिनी शिवानी राजन वाघेला हिने ‘सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक निबंध सादरीकरण’ या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

बेळगाव येथील रहिवासी तसेच बागलकोट येथील पी.एम.एन.एम. दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची विद्यार्थिनी असलेल्या शिवानी राजन वाघेला हिने प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. कारवार येथे आयोजित केलेल्या ५१ व्या आयडीए राज्यस्तरीय परिषदेत तिला कर्नाटक राज्य दंत परिषदेकडून ‘सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक निबंध सादरीकरण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवानीने “आर्थोकेराटीनाईज्ड ओडोंटोजेनिक सिस्ट – जबड्याचे विकृतीशास्त्र” या विषयावर आपला प्रबंध सादर केला होता. यावेळी तिला शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कामगिरीसाठी तिला डॉ. महादेवी होसूर (ओरल अँड मॅक्सिलोफेशियल पॅथोलॉजी आणि ओरल मायक्रोबायोलॉजी विभाग), जी.जी. चिटणीस शाळेचे मुख्याध्यापक नवीन शेट्टिगार्, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि विशाल वेशणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: