धारवाड विद्यागिरी पोलिस ठाण्यातून लोकायुक्त विभागात नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक संगमेश दिड्डीगनाळ यांना राज्य सरकारने धारवाड उपनगर पोलिस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. उपनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक असलेले दयानंद शेगुणसी यांची लोकायुक्त विभागात बदली करण्यात आली आहे.

गरग सर्कलचे पोलीस निरीक्षक असलेले आणि यापूर्वी डी.सी.आर.बी. मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक समीर मुल्ला यांची राज्य सरकारने कुंदगोळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.


Recent Comments