Kagawad

उगार साखर कारखान्याचा ८४ वा गाळप हंगाम सुरू

Share

खानापूर तालुक्यातील उगार साखर कारखान्याच्या ८४ व्या ऊस गाळप हंगामाच्या बॉयलरची पूजा उद्योजक प्रफुल्ल शिरगावकर यांच्या हस्ते पार पडली.

उगार साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांनी बॉयलर पूजेनंतर माहिती देताना सांगितले की, सध्या प्रतिदिन २० हजार टन गाळप क्षमता असलेला हा कारखाना यंदाच्या हंगामात २१ लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले असून, ७५ मेगावॅट वीज आणि ८ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती करत आहे; तसेच त्यांनी शासनाच्या एफआरपी दराने ऊस पेमेंट करण्याची ग्वाही देत, हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या बॉयलर पूजा कार्यक्रमात शिवगौडा कागे, शितल पाटील, शंकर वागमोडे, दादा पाटील, राजेंद्र भूतादार, अरुण गाणीगेर, अथर्व गायतोंडे, अलाउद्दीन रोहिले, सुनील पाटील, दादोबा थोरुशे, अरविंद कारची, महादेव कटगेरी यांच्यासह शेकडो शेतकरी नेते, प्रगतीशील शेतकरी आणि अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्याचे मुख्य अधिकारी बुजबली अकिवाटे यांनी पूजा केली. केन मॅनेजर ए.बी. होन्ननवर यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: