विजापूर जिल्ह्यात दोन युवकांची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून दगड व दगडाने ठेचून दोघांना ठार मारल्याची घटना काल मध्यरात्री विजापूर तालुक्यातील कन्नूर गावात घडली आहे. सागर बेळुंडगी (२५) आणि इसाक खुरेशी (२४) या दोन युवकांची हत्या करण्यात आली आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केल्यानंतर तेथून पळ काढला. जुन्या वैमनस्यातून सागर आणि इसाक यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी प्राथमिक शंका व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी इसाक खुरेशी आणि सागर या दोघांनी मिळून गावातील ईरनगौडा नावाच्या व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. उपचार घेत असताना काही दिवसांनी ईरनगौडा यांचा मृत्यू झाला होता. याच सूडापोटी ही दुहेरी हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर विजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस तपास करत आहेत.


Recent Comments