Belagavi

टिळकवाडी ‘फर्स्ट गेट’ जवळील बॅरिकेड्स त्वरित हटवा

Share

टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स त्वरित हटवावे, यासाठी सुभाष घोळप यांनी डीजी-आयजीपी डॉ. एम.ए. सलीम यांच्याकडे निवेदन सादर केले.

पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटवण्याची मागणी सुभाष घोळप मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी नुकतेच डीजी-आयजीपी डॉ. एम.ए. सलीम यांना निवेदन सादर केले. यावर, एडीजीपी यांनी पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बेळगावमधील नागरिकांनी, चालत्या वाहनांना अडवून कागदपत्रांची तपासणी न करण्याच्या आदेशाचे स्वागत केले आहे.

निवेदन सादर करताना अजित नाईक, सुमंत धारेश्वर, मनोहर रोकडे, दीपक गवंडळकर, रमेश फाटक, श्रीकांत कदम, एम.बी. हूगार, रणजित हावळण्णाचे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Tags: