Belagavi

एक भ्रष्ट गेला आणि दुसरा भ्रष्ट आला तर राज्याचे भले होणार नाही : सी. टी. रवी

Share

‘एक भ्रष्ट जातो आणि दुसरा भ्रष्ट येतो’, यामुळे राज्याचे भले होणार नाही, असे म्हणत विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी काँग्रेस सरकारवर तीव्र टीका केली.

शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. बेळगाव, विजापूर, रायचूर, बिदर, आणि कलबुर्गी येथे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी संकाटात असून लाखो पीक नुकसानग्रस्त झाले आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरकार आणि मंत्र्यांनी संवेदनशीलता गमावली आहे, असे ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांना निवडणुकीची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत आहे. लोकांचे दुःख ऐकण्याची संवेदनशीलता त्यांच्यात नव्हती. आता तरी जिल्ह्याच्या मंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. सरकारमध्ये ‘मीच मुख्यमंत्री’, ‘मीच मुख्यमंत्री’ सुरू आहे. तुम्ही कोण मुख्यमंत्री आहात, यापेक्षा जनतेने तुम्हाला अधिकार दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या समस्यांना प्रतिसाद द्या, असे ते म्हणाले.

याशिवाय, “आणखी दोन वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार”, असे सिद्धरामय्या म्हणत आहेत. तुम्ही भ्रष्टाचारासाठी मुख्यमंत्री झालात का? कंत्राटदारांनी पत्र लिहिले आहे, ते वाचून तुम्हाला लाज वाटली नाही का? त्यांनी भ्रष्टाचार दुप्पट झाल्याचे लिहिले आहे. महागाईमुळे सामान्य जनता संकटात आहे. तुम्ही आल्यापासून साठ वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत, त्याची यादी द्यायची का? असे ते म्हणाले. आजची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री बदलून परिस्थिती सुधारणार नाही. सरकार बदलले तरच सुधारणा होईल. तो आला तरी भ्रष्टाचार करतो आणि हा आला तरी भ्रष्टाचार करतो. या सरकारला डोळे असूनही अंधत्व आणि कान असूनही बधिरता आली आहे, असा आरोप त्यांनी केला.

“दोन महिन्यांपासून येथील मंत्र्यांसाठी निवडणूक मोठी झाली आहे,” असेही ते म्हणाले. उद्या मुख्यमंत्र्यांकडून होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनाबाबत उत्तर देताना ते म्हणाले, “तुम्ही उद्घाटन केल्याबद्दल काही चूक नाही, पण शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्या. संकटांना प्रतिसाद देण्यापेक्षा तुम्हाला उत्सव साजरा करणे महत्त्वाचे आहे. आमची चिंता महागाई आणि हिंदुत्व टिकवण्याबद्दल आहे.”

“मीच मुख्यमंत्री” या सिद्धरामय्यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले, हे काँग्रेसचे हायकमांड दुर्बळ झाल्याचे संकेत आहेत. आधी हायकमांड निर्णय घेणार, असे म्हटले जात होते. आता सिद्धरामय्या स्वतःच मीच मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. यामुळे सिद्धरामय्या यांनी हायकमांडला आव्हाहन दिले आहे. आधी ‘मीच’ म्हणणाऱ्यांवर कारवाई होत होती. कोण मुख्यमंत्री झाल्यास चांगले होईल, याबद्दल विश्वास नाही, असे ते म्हणाले.

Tags: