नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत सिद्धरामय्या मुख्यमंत्री पद गमावतील, हे शंभर टक्के सत्य आहे, असा बॉम्ब विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी पुन्हा एकदा टाकला.

शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. अधिकार वाटपाबाबत करार झाला आहे, हे सत्य आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ‘क्रांती’ होणार असे सांगणारे एक मंत्री आता घरी गेले आहेत. आता वाद सुरू झाला आहे. सिद्धरामय्या अधिकार सोडणार नाहीत आणि डीकेशी हट्ट सोडणार नाहीत.
काँग्रेसच्या या वादामुळे सरकार पडल्यास आम्ही सरकार बनवणार नाही. तर आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत. काँग्रेसचे आमदारच अनुदान मिळाले नसल्याचे सांगत आहेत. बंगळूरमध्ये खड्डे नसलेला रस्ता दाखवल्यास बक्षीस देता येईल, असा व्यंग्यात्मक टोला देखील त्यांनी लगावला. याशिवाय पीक नुकसान आणि पुराबाबत भाजपचे पथक आज बेळगाव, विजापूर जिल्ह्यांना भेट देणार आहे. राज्य सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गॅंगला केवळ जात सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. जातींमध्ये आग लावण्याचे काम सिद्धरामय्यांचे आहे. सिद्धरामय्या हे आग लावणारे मुख्यमंत्री झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला. हसन येथे भूस्खलनामुळे मोठी हानी झाली आहे. मुख्यमंत्री “केंद्र सरकारने मदत करावी” असा डायलॉग मारत आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते हाच डायलॉग मारत आहेत, असे आर. अशोक म्हणाले.
पावसामुळे किती नुकसान झाले याचा अहवाल केंद्राकडे पाठवणे आवश्यक आहे. राज्य नेत्यांनी अद्याप केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्र्यांची भेट घेतली नाही. मुख्यमंत्री, मंत्री बेजबाबदारपणे वागत आहेत. किती घरे नुकसानग्रस्त झाली याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या तोंडून एकही शब्द आलेला नाही. “मीच मुख्यमंत्री राहणार,” असे सिद्धरामय्या म्हणत आहेत. “तुम्ही कधी सोडणार?” असे तिथले नेते विचारत आहेत, जबाबदारी असती तर पूरग्रस्त भागाला भेट दिली असती. राज्यात पुन्हा पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या बदलाची चर्चा होत आहे. हे एक तुघलकी सरकार आहे. काँग्रेस सरकार ८० टक्क्यांचे सरकार आहे, असे कंत्राटदार संघाने सांगितले आहे. लूट करण्यासाठी सर्व मंत्री वाट पाहत आहेत, अशी टीकाही आर. अशोक यांनी केली.


Recent Comments