Dharwad

एसजेएमव्ही महांत महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे उद्घाटन

Share

विद्यार्थ्यांनी वेळेच्या मूल्याबाबत जागरूक राहावे. वेळेचा आदर केल्यास, ती निश्चितपणे तुमचा सन्मान करेल, असे हुबळी-धारवाड शहर पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी स्पष्ट केले.

धारवाड येथील एसजेएमव्ही महांत कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ‘यशासाठी कोणताही शॉर्टकट नको,’ असे ते म्हणाले. तुमचे ध्येय निश्चित असावे आणि त्यानुसार तुमचे प्रयत्न असावेत. ‘मागे गुरू आणि पुढे ध्येय’ ठेवा. कठोर परिश्रम घेतल्यास यश तुमच्या पाठीमागे येईल. यशाच्या या प्रवासात परिश्रमाची साथ असू द्या. तुमचा प्रयत्नच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पोलीस आयुक्त एन. शशिकुमार पुढे म्हणाले, “तुमचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण असावे. तुमच्यात कृतज्ञतेची भावना असावी. देशाचे भावी नागरिक म्हणून देशाचा विचार करा आणि समाजभिमुख कामांमध्ये सक्रिय व्हा,” अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजशेखरप्पा एम. म्हणाले, “जीवनात उत्कृष्ट यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. आपले ध्येय आणि गुरूंचे योग्य मार्गदर्शन यातून तुम्ही तुमचे भविष्य घडवा. अशा व्यासपीठांद्वारे तुमच्यातील प्रतिभेला वाव द्या. आपल्या स्वभावात साधेपणा ,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी संघटनेचे चेअरमन प्रो. एम. बी. अलगवाडी, आयक्यूएसी समन्वयक प्रो. सी. के. हुबळी, डॉ. पुष्पा बसनागौडर, प्रो. के. एस. मेलमाळगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: