यूट्यूब आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर विनोदी व्हिडीओंमुळे प्रसिद्ध असलेल्या धारवाडच्या एका यूट्यूब स्टार विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

खाजा शिरहट्टी उर्फ मुकळेप्पा या यूट्यूब स्टारवर हिंदू तरुणीला बनावट कागदपत्रे वापरून फसवून विवाह केल्याचा आरोप आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, मुकळेप्पा मूळचा मुस्लिम असून त्याने मुंडगोड उपनिबंधक कार्यालयात खोटे दस्तऐवज सादर करून एका हिंदू तरुणीशी विवाह केला.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले की, मुकळेप्पा जाणूनबुजून हिंदू तरुणींना आपल्या व्हिडिओंसाठी लक्ष्य करतो. तो आपल्या शॉर्ट व्हिडीओमध्ये हिंदू तरुणी आणि हिंदू धर्माची चेष्टा करतो. ५ जून रोजी त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका हिंदू तरुणीशी विवाह केला. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुकळेप्पाने विवाह केलेल्या तरुणीचीही चौकशी केली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हिंदू तरुणींना वापरून हिंदू धर्मावर आणि परंपरांवर टीका करणारे व्हिडीओ बनवणाऱ्या मुकळेप्पावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
बजरंग दलाचे नेते सिद्धू हिरेमठ यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


Recent Comments