Bagalkot

बागलकोटमध्ये मुसळधार पावसामुळे तीन घरे कोसळली

Share

बागलकोटजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोठी हानी झाली असून, तीन घरांची पडझड झाली आहे. इलकल तालुक्यात ही घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलण्यास सांगितले आहे.

बागलकोटजिल्ह्यातील इलकल तालुक्यातील गोनाळ एस टी गावात यंकण्णा आणि बागेव्वा मादार यांच्यासह तीन घरांचे छत पावसामुळे कोसळले. या घटनेची पूर्वसूचना मिळाल्यामुळे वेळीच सर्वजण बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “सर्वांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Tags: