धारवाडमध्ये एका भीषण अपघातात एका दुचाकी आणि ट्रकची जोरदार धडक होऊन दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी धारवाड बाहेरील इटि्टगट्टीजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीस्वार हुबळीकडून धारवाडकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतरच मृत दुचाकीस्वारांची ओळख पटू शकेल.


Recent Comments