गेल्या १८ वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील बीएसएफच्या ८० व्या बटालियनमध्ये सेवा बजावत असलेले जवान रमेश बादामी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.

बागलकोट तालुक्यातील शिरूर शहरातील ४२ वर्षीय रमेश बादामी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील बीएसएफच्या ८० व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना ‘ब्रेन ट्यूमर’ झाल्याने श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. शिरूर गावात त्यांचे पार्थिव आल्यानंतर गावकऱ्यांनी बाईक रॅली काढून “भारत माता की जय”च्या घोषणा दिल्या. सिद्धेश्वर हायस्कूलच्या आवारात अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. पार्थिव पाहून पत्नी आणि कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता. बागलकोट जिल्हा पोलीस आणि बीएसएफच्या जवानांच्या उपस्थितीत खासदार पी.सी. गद्दीगौडर यांच्यासह अनेक अधिकारी आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.


Recent Comments