धारवाडहून हल्याळला निघालेल्या एका बसच्या मागच्या टायरमधून अचानक धूर येऊ लागल्याची घटना आज धारवाडमध्ये घडली. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आहे.

ही घटना श्री नगर सर्कलजवळ घडली. धारवाड डेपोची ही बस धारवाडहून हल्याळच्या दिशेने जात होती, तेव्हाच तिच्या मागील बाजूस धूर दिसू लागला. धुराचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यावर बस चालकाने तत्काळ बस बाजूला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले.
तपासणी केल्यावर बसच्या मागील चाकाजवळील ब्रेक लाइनर जाम झाल्याने धूर येत असल्याचे लक्षात आले. सध्या ही बस परत धारवाड डेपोमध्ये नेण्यात येत आहे, तर प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली.


Recent Comments