Dharwad

धारवाडमध्ये गणेश विसर्जनाच्या गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न

Share

गणेश विसर्जनाच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरांना धारवाडमधील केलगेरी परिसरात स्थानिकांनी चांगलाच धडा शिकवला.

अकरा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरांचा स्थानिकांनी पाठलाग केला आणि त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. चोरांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Tags: