धारवाडमध्ये महिला आणि विद्यार्थिनींनी वाढत्या महिला अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे करावेत, तसेच बलात्काराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्लील वेबसाइट्स आणि अंमली पदार्थांवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली.

अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटनेच्या नेतृत्वाखाली धारवाडच्या विवेकानंद सर्कल येथे महिलांनी आणि विद्यार्थिनींनी बलात्कारी आणि केंद्र-राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून देशभरात आणि राज्यात महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळ आणि बलात्कार यांसारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंमली पदार्थ आणि बलात्काराला प्रवृत्त करणाऱ्या वेबसाइट्स हे महिला अत्याचाराचे मुख्य कारण असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महिला आणि विद्यार्थिनींना निर्भयपणे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
याचबरोबर महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत. यासोबतच अंमली पदार्थ आणि अश्लील वेबसाइट्सवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.


Recent Comments