धारवाडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बाईक चालकाला वाहतूक पोलिसांनी तब्बल ४५ गुन्ह्यांमुळे ₹१२,००० चा दंड भरण्यास भाग पाडले आहे.

अजय कलाल नावाच्या बाईकचालकावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ४५ गुन्हे दाखल होते. गृह विभागाने अशा प्रकरणांमध्ये ५०% सूट देण्याचे निर्देश दिल्यानंतर, पोलिसांनी थेट अजयच्या घरी जाऊन दंडाची पावती दिली. धारवाड वाहतूक पोलीस स्टेशनचे कर्मचारी विठ्ठल मायण्णावर आणि मंजुनाथ हट्टीमणी यांनी अजय कलाल यांच्या घरी जाऊन त्याला दंडाची पावती दिली. या ५०% सूटमध्येही त्याला ₹१२,२५० चा दंड भरावा लागला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि ‘आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही’ असे समजणाऱ्या वाहनचालकांना धारवाड पोलिसांनी या कारवाईतून चांगलाच धडा शिकवला आहे.


Recent Comments